राहुल गांधी काँग्रेसबाबत गंभीर नाहीत : कृष्णा

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. "काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसबाबत गंभीर नाहीत', अशी टीका त्यांनी केली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 'काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसबाबत गंभीर नाहीत', अशी टीका त्यांनी केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, "गेल्या अडीच वर्षांपासून मी पाहात आहे की काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी वगळता कोणताही नेता पक्षाबाबत गंभीर नाही. कोणालाही काहीच गांभीर्य नव्हते. जर तुम्हाला एकाद्या पक्षाची तळागाळापासून ते सर्वश्रेष्ठतेपर्यंत पुनर्बांधणी करायची असते, त्यावेळी तुम्ही गंभीर असायला हवे. मात्र, मला तेवढी वचनबद्धता आणि तेवढे कष्ट करण्याची तयारी असल्याचे दिसत नाही.' यावेळी कृष्णा यांनी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाबद्दलही काँग्रेसवर टीका केली. सोनिया गांधींचे कौतुक करताना ते म्हणाले, "त्या अनेक प्रचारसभा घेत असतात. त्या कार्यकर्त्यांना नावासह ओळखतात. मात्र, त्याचे सध्या कोणाला काहीही वाटत नाही.' वर्षभरानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर कृष्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे.

कोण आहेत एस. एम. कृष्णा?
एस. एम. कृष्णा हे काँग्रेसचे ज्येष्ठे नेते होते. बुधवारी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यापूर्वी मे 2009 ते ऑक्‍टोबर 2012 दरम्यान ते भारताचे परराष्ट्र मंत्री होते. याशिवाय त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय त्यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री पद, महाराष्ट्राचे राज्यपाल पदही भूषविले आहे.