प. बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न : भाजप

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

वाराणसी - लहान मुलांच्या तस्करीप्रकरणी भाजप नेत्याला केंद्रीय अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांविरूद्ध कारवाई करून राज्य सरकारला कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले, "पश्‍चिम बंगालचे सरकार आणि पोलिस सरकारप्रमाणे नव्हे तर पक्षाप्रमाणे काम करत आहेत. माझा त्यांच्या तपासावर विश्‍वास नाही. कोणत्याही परिस्थितीत ते भाजपच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर भाजप कार्यकर्त्यांचा कोणत्याही प्रकरणाशी संबंध असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अर्थात, जुही चौधरी जर या प्रकरणाशी संबंधित असेल, तर तिच्यावरही कारवाई करण्यात यावी.'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्‍चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात उघडकीस आलेल्या मुलांच्या तस्करी प्रकरणात प्रमुख आरोपी जुही चौधरी हिला भारत-नेपाळ सीमेजवळून मंगळवारी रात्री अटक करण्यात आले. बतासी भागातील 17 मुलांची तस्करी केल्याप्रकरणी जुही चौधरीचा शोध घेण्यात येत होता. अखेर तिला अटक करण्यात यश आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीआयडी) पिंटल गावात उभारण्यात आलेल्या कार्यालयात तिची चौकशी केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. जलपाईगुडी येथील जिल्हा न्यायालयाने तिची बारा दिवसांच्या सीआयडी कोठवडीत रवानगी केली आहे.