विमानात प्रवासातच झाला प्रवाशाचा मृत्यु!

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - जेट एअरवेजच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा विमानातच मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानातील कर्मचाऱ्यांनी आवश्‍यक त्या प्राथमिक वैद्यकीय सेवा पुरविल्या आणि पुढील उपचारासाठी विमानाचा मार्ग बदलला. मात्र तरीही प्रवासाचा प्राण वाचविण्यात यश मिळाले नाही.

सोमवारी रात्री उशिरा जेट एअरवेजचे 9W 202 हे विमान नवी दिल्लीवरून दोहाच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी विमानामध्ये एकूण 141 प्रवासी होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळाने एका प्रवाशाला अस्वस्थ असल्याचे वाटले. त्यानंतर त्या प्रवाशाला तातडीचे प्राथमिक वैद्यकीय उपचार देण्यात आले. पुढील वैद्यकीय उपचार करण्यासाठी विमानाचा मार्ग बदलण्यात आला आणि विमान कराचीकडे वळविण्यात आले. मात्र कराचीमध्ये पोचण्यापूर्वीच प्रवाशाचा मृत्यु झाला होता, अशी माहिती जेट एअरवेजने दिली आहे. मात्र प्रवाशाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यानंतर नियमाप्रमाणे प्रवाशाचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी विमान नवी दिल्लीकडे हलविण्यात आले. तसेच इतर प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पर्यायी विमानाची सोय करण्यात आली, असेही जेट एअरवेजने सांगितले आहे.