पठाणकोटमध्ये संशयित दिसल्याने अतिदक्षतेचा इशारा

वृत्तसंस्था
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

चंदीगड- पठाणकोटमध्ये स्थानिक नागरिकांना संशयित शस्त्रधारी व्यक्ती दिसल्याने घटनास्थळी शोध मोहिम हाती घेण्यात आली असून, अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

स्थानिक नागरिकांना मंगळवारी (ता. 27) संशयित चार शस्त्रधारी व्यक्ती आढळून आल्या होत्या. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना कळविली होती.

पठाणकोट जिल्हा पोलिसचे मुख्य अधिकारी राकेश कौशल यांनी सांगितले की, 'स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर छक्की नदीच्या किनारी व जवळ असलेल्या जंगलामध्ये जवानांनी शोधमोहिम सुरू केली आहे. परंतु, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ठिकठिकाणी तपास मोहिम हाती घेण्यात आली असून, अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.'

दरम्यान, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 2 जानेवारी रोजी येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला केला होता. यामध्ये सात जवानांचा मृत्यू झाला होता.