जमावाच्या हल्ल्यात पीडीपीचे आमदार जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वणीच्या मृत्यूनंतर गेल्या अकरा दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहे.

श्रीनगर - श्रीनगरकडे जात असलेले सत्ताधारी पीडीपीचे आमदार मोहम्मद खलील बंध हे जमावाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वणीच्या मृत्यूनंतर गेल्या अकरा दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहे. आतापर्यंत याठिकाणी झालेल्या चकमकीत 40 हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. काश्मीर खोऱ्यात अद्याप संचारबंदी कायम आहे. आता प्रदर्शनकारी जमावाकडून सत्ताधारी आमदार मोहम्मद बंध यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

पुलवामा मतदारसंघातील आमदार असलेले मोहम्मद बंध आज (सोमवार) पहाटे श्रीनगरकडे येत असताना जमावाने त्यांच्या मोटारीवर दगडफेक केली. चालकाने गाडी जोरात नेण्याच्या प्रयत्न केल्यानंतर ती खड्ड्यात पलटली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंध यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती रुग्णालयात पोहचल्या.