निवडणुकीपेक्षा जनता महत्वाची ; कमल हसनचा पंतप्रधानांना टोला

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

कावेरी पाणी वाटपावरून तमिळनाडूच्या जनतेकडून 'चले जावो मोदी'ची नारेबाजी करण्यात येत आहे. सध्या या भागात येथील जनतेकडून विरोध केला जात आहे. यासाठी आज येथील जनता याविरोधात रस्त्यावर उतरली आहे.

नवी दिल्ली : कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याने मक्कल निधी मायमचे (एएनएम) अध्यक्ष कमल हसनने पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "निवडणुकीपेक्षा जनता महत्वाची आहे''. 

तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. त्यावर आज कमल हसन यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. ते म्हणाले, मला असे वाटते की जनतेमध्ये विश्वास वाढायला हवा. निवडणुकांपेक्षा जनता महत्वाची आहे. तमिळनाडू आणि कर्नाटकातील जनतेला न्याय मिळावा. तसेच कमल हसन यांनी पंतप्रधान मोदींकडे कावेरी पाणी वाटपावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा पाठपुरावा सुरु केला आहे. याबाबत कमल हसन यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. तसेच कमल हसन, अभिनेता रजनीकांत, विजय, विक्रम यांच्यासह अन्य काही अभिनेत्यांकडून याविरोधात आवाज उठविण्यात येत आहे. याशिवाय त्यांच्याकडून कावेरी बोर्डाची स्थापना करण्याची मागणी केली जात आहे.  

kaveri water

कावेरी पाणी वाटपावरून तमिळनाडूच्या जनतेकडून 'चले जावो मोदी'ची नारेबाजी करण्यात येत आहे. सध्या या भागात येथील जनतेकडून विरोध केला जात आहे. यासाठी आज येथील जनता याविरोधात रस्त्यावर उतरली आहे.

दरम्यान, कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमधील वाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सांगितले, की कावेरी नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही. यावेळी न्यायालयाने तामिळनाडूला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केली होती. मात्र, दुसरीकडे कर्नाटक राज्याचा पाण्याचा वाटा वाढवण्यात आला होता. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याचे काम केंद्र सरकार करणार असल्याचेही न्यायालायने सांगितले होते.
 

Web Title: people are more important than elections says Kamal Hassan to Modi