सरकारवर आता लोकांचा विश्वास नाही : प्रफुल्ल पटेल

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

नवी दिल्ली : भंडारा-गोंदियामध्ये मतमोजणी सुरु आहे. तर पालघरमध्ये भाजपचा विजय झाला. या मतदारसंघात तीन प्रमुख पक्षांनाही 2 लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजपने यावर खूश होण्याचे कारण नाही. सरकारवर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली. 

लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या दहा जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, केंद्र सरकारने जनतेला जी आश्वासने दिली आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर मतदारांची नाराजी यामधून व्यक्त होत आहे. पटोले आणि इतरांनी आम्हाला साथ दिली. विरोधीपक्ष एकत्र आले तेव्हा याचा परिणाम समोर आला. जनतेची केंद्र आणि राज्य सरकारवर असलेली नाराजी दिसत आहे.

ते पुढे म्हणाले, भंडारा-गोंदियाची मतमोजणी सुरु आहे. त्यामुळे यावर नंतर बोलेन. आमच्या सरकारच्या काळात काही चुका झाल्या म्हणून मागील निवडणुकीत माझा पराभव झाला. या निवडणुकीच्या निकालाचा असा अर्थ निघतो, की सर्वांनी एकत्र यावे. त्यानंतर भाजपचा पराभव नक्की होईल. 

Web Title: peoples not believe on Government says Praful Patel