"इंदू सरकार'विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात धाव

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जुलै 2017

कॉंग्रेसचे नेते संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा प्रियाने केला आहे. आता या चित्रपटाविरोधात त्या सर्वोच्च न्यायालात जाणार आहेत

नवी दिल्ली - "इंदू सरकार' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करीत त्याला स्थगिती द्यावी, अशी मागणी प्रिया सिंग पॉल यांची याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली होती. कॉंग्रेसचे नेते संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा प्रियाने केला आहे. आता या चित्रपटाविरोधात त्या सर्वोच्च न्यायालात जाणार आहेत.

न्या.दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाकडे तिने "इंदू सरकार'चे प्रदर्शन रोखण्याची मागणी केली आहे. 70 टक्के हिंदी चित्रपट हे काल्पनिक कथेवर तर 30 टक्के चित्रपट वास्तवतेवर आधारित असतात, असा दावाही तिने केला.

"असे का हे सिद्ध करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांतच या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुद्दा आल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली,'' असे प्रिया सिंग यांच्या वकिलांनी सांगितले.