पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील : नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल, डिझेलला जीएसटी लागू केल्यास 7 ते 8 रुपयांनी ते स्वस्त होईल. पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करण्याच्या दृष्टीने सरकार त्यावर चर्चा करीत आहे, अशी भूमिका केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल, डिझेलला जीएसटी लागू केल्यास 7 ते 8 रुपयांनी ते स्वस्त होईल. पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करण्याच्या दृष्टीने सरकार त्यावर चर्चा करीत आहे, अशी भूमिका केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, 'पेट्रोल, डिझेलचे दरवाढ झाल्याने त्याचा सर्वांवर परिणाम होत असला. तरी खाद्य पदार्थांचे दर कमी असून या सर्व गोष्टी लक्षात घेता येत्या सहा महिन्यांच्या काळात इथोनॉल आणि इलेक्ट्रीकवर चालणारी वाहने बाजारात येणार आहेत. प्रत्येक नागरिकाची महिन्याला किमान चार रुपयांची बचत होईल.' 

राज्यात अनेक टोल वसुली बंद करण्याची मागणी केली जात आहे. या प्रश्नावर ते म्हणाले की, 'राज्यातील अनेक भागात रस्त्याची कामे चालू आहेत. तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे असल्यास टोल सुरूच राहणार. ते कधीही बंद होणार नाही. तसेच मी टोल बंद करणार बोललो असे म्हटले जाते. पण मी टोल बंद करणार असे कधी बोललो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.'

पत्रकार परिषदेत गडकरी यांनी काँग्रेसवरही टिका केली.  'भाजपावर घटनेत बदल केल्याची टीका काँग्रेसकडून केली जाते. मात्र त्यांची सत्ता असताना 72 वेळा घटना बदलली गेली आहे' असा आरोपही गडकरी यांनी केला. 

2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले असताना पेट्रोलच्या दराने सत्तरी गाठली होती. त्यावेळी यूपीए सरकारवर टीका करत आम्ही हे दर कमी करु, असा दावा काँग्रेस सरकारने केला. काही महिन्यांसाठी पेट्रोलचे दर 62 रुपये प्रति लिटर इतके कमी झाले. पण गेल्या महिन्यात पेट्रोल 85 तर डिझेल 70 रुपये प्रति लिटर पर्यंत पोहोचले आहे.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Petrol And Diesel Rates Will Be Reduced By 7 to 8 Rupees says Nitin Gadkari