काश्मिर: मंत्र्यांच्या घरावर फेकला पेट्रोल बॉम्ब

पीटीआय
मंगळवार, 2 ऑगस्ट 2016

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरचे शिक्षण मंत्री नईम अख्तर यांच्या श्रीनगर येथील घरावर दोन पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी घडली.

नईम अख्तर यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्याच्या वेळी ते घरात नव्हते. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी बुऱ्हान वणीला ठार मारल्यानंतर हिंसाचाराच्या घटना घडत आहे. आता आंदोलनकर्त्यांनी मंत्र्यांच्या घरांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. दोन पेट्रोल बॉम्ब फेकल्याने अख्तर यांच्या घराचे नुकसान झाले आहे. पण, सुदैवाने या घटनेत कोणलाही इजा पोहचलेली नाही.

काश्मीर खोऱ्यात 8 जुलैपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहे. आतापर्यंत याठिकाणी 40 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, काही भागात अद्याप संचारबंदी कायम आहे.

टॅग्स