पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात 

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

तेल उत्पादक देशांची संघटना "ओपेक'च्या सदस्य देशांकडून उत्पादनात कपात सुरू आहे. मात्र, अमेरिकेकडून वाढलेला कच्च्या तेलाचा पुरवठा आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे दर कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. 

नवी दिल्ली - तेल कंपन्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.77 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2.91 रुपये कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम पंधरवड्याला पेट्रोल व डिझेलच्या दराचा आढावा घेतात. जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या दरानुसार हा आढावा घेण्यात येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर लक्षात घेऊन या कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात केली आहे.

तेल उत्पादक देशांची संघटना "ओपेक'च्या सदस्य देशांकडून उत्पादनात कपात सुरू आहे. मात्र, अमेरिकेकडून वाढलेला कच्च्या तेलाचा पुरवठा आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे दर कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे.