पेट्रोल 14 पैसे, डिझेल 10 पैशांनी महागले

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 पैसे वाढ मंगळवारी रात्रीपासून करण्यात आली. वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले आहे, की पेट्रोल आणि डिझेल वितरकांच्या कमिशनमध्ये बदल झाल्याने दरवाढ करण्यात येत आहे. याआधी 1 ऑक्‍टोबरपासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 36 पैसे वाढ करण्यात आली होती, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 7 पैसे कपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या बदललेल्या दरांचा आणि रुपया व डॉलरच्या विनिमयाचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता.