देशभरात पेट्रोलची दरवाढ सुरूच 

Petrol price regularly hike
Petrol price regularly hike

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोलच्या दरातील वाढ शनिवारी कायम राहिली. पेट्रोलचा दर दिल्लीत आज प्रतिलिटर 82.44 रुपये आणि मुंबईत 89.80 रुपयांवर पोचला.

चेन्नईत पेट्रोलचा दर आज प्रतिलिटर 85.69 रुपये आणि कोलकत्यात 84.27 रुपयांवर गेला. डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी वाढ करण्यात आलेली नाही. दिल्ली, कोलकता, मुंबई आणि चेन्नईमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर अनुक्रमे 73.87, 75.72, 78.42 आणि 78.10 रुपयांवर स्थिर आहे. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात वाढ होत असल्याने देशातही इंधन दरात वाढ सुरू आहे. यातच अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण होत असल्यासे खनिज तेलाची आयात महागली आहे. यामुळेही देशांतर्गत इंधनदरात वाढ होत आहे.

याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारच्या जादा करामुळेही इंधनदर भडकले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरामध्ये करांचे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. याच आठवड्यात पश्‍चिम बंगाल सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर एक रुपया आणि कर्नाटक सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपये कपात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com