मुझफ्फरपूर गर्ल्स हॉस्टेलमध्ये लैंगिक शोषण ; 3 मुली गर्भवती

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जून 2018

या बालिकागृहात 6 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलींना आश्रय दिला जातो. बालिकागृहातील 44 मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यापैकी 3 मुली गर्भवती राहिल्या आहेत. राजकीय नेत्यांपासून ते अधिकाऱ्यांच्या घरात मुलींना या बालिकागृहातून पाठविले जात असल्याचेही यातून समोर आले आहे.  

पटना : मुझफ्फरपूरमध्ये सरकारी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या बालिकांवर लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हॉस्टेलमधील 44 मुलींवर लैंगिक शोषण करण्यात आले. या 44 पैकी 3 मुली गर्भवती राहिल्याचेही यामध्ये स्पष्ट झाले आहे. याबाबत मुंबईतील प्रतिष्ठित संस्था 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'ने ऑडिट रिपोर्ट जारी केला. त्यामध्ये ही बाब समोर आली.

सरकारी गर्ल्स हॉस्टेलमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली. याबाबतची माहिती उघडकीस आल्यानंतर बालिकागृहाचे संचालन करणारे अधिकारी फरार आहेत. जिल्हा प्रशासनाने बालिकांना पटना आणि मधुबनी येथे स्थलांतरित केले. त्यानंतर बालिका सुधारगृह सील करण्यात आले. याप्रकरणी 'सेवा संकल्प आणि विकास समिती'विरोधात कायदेशील कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

दरम्यान, या बालिकागृहात 6 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलींना आश्रय दिला जातो. बालिकागृहातील 44 मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यापैकी 3 मुली गर्भवती राहिल्या आहेत. राजकीय नेत्यांपासून ते अधिकाऱ्यांच्या घरात मुलींना या बालिकागृहातून पाठविले जात असल्याचेही यातून समोर आले आहे.  

Web Title: Physical Exploitation In Muzaffarpur Hostel 3 Minor Girls Pregnant Out Of 44