रुसवेफुगवे बाजूला ठेवा - पंतप्रधान

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 31 जानेवारी 2017

सरकार सर्व मुद्यांवर चर्चेसाठी तयार असून, वरिष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा देशाला फायदा मिळावा, यासाठी संसदेतील चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले

नवी दिल्ली - 'संसद ही महापंचायत असून, निवडणुकीच्या काळात उद्‌भवणारे सर्व रुसवेफुगवे बाजूला ठेवून सर्वांनी चर्चा करावी आणि लोकशाहीला पुढे न्यावे,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सर्व राजकीय पक्षांना सहकार्याचे आवाहन केले. संसद अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.

नोटाबंदीमुळे हिवाळी अधिवेशन गोंधळात वाया गेले होते. अखेरच्या दिवसाचा अपवाद वगळता हिवाळी अधिवेशनादरम्यान काहीही कामकाज होऊ शकले नव्हते. त्या पार्श्‍वभूमीवर मोदींनी विरोधकांना संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याची साद घातली. संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी सर्वपक्षीय बैठकीची माहिती देताना सांगितले, की सरकार सर्व मुद्यांवर चर्चेसाठी तयार असून, वरिष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा देशाला फायदा मिळावा, यासाठी संसदेतील चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. दरम्यान, सर्व पक्षांनी पंतप्रधानांच्या आव्हानाला सरकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचा दावाही अनंतकुमार यांनी केला.

देश

नवी दिल्ली : दुकानाच्या दारात दारू प्यायला बसलेल्यांना हटकल्याने दारूड्यांनी केलेल्या चाकुहल्ल्यात नवी दिल्लीत एकाचा मृत्यू झाला...

02.27 PM

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रवेशाचा ठराव संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षाने आज (शनिवार) संमत केला. पक्षाच्या...

02.09 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर प्रकरणावरून आज (शनिवार) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर...

01.42 PM