पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची मदत जाहीर

PM Modi Announces Rs 500 crore aid for Keral
PM Modi Announces Rs 500 crore aid for Keral

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधानांनी हवाई पाहणी केली असून, त्यांनी केरळसाठी 500 कोटींची तत्काळ मदत जाहीर केली. 

केरळमधील पुरात आत्तापर्यंत 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधींचे नुकसान झाले. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील कोचीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हवाई पाहणी करत पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांच्यासह केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यपाल पी. सथासिवम आणि केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्सो यांनी हवाई पाहणी केली. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख तर यातील गंभीर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली. यापूर्वी 100 कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता 500 कोटींची मदत देण्यात येणार आहे.

दरम्यान, केरळच्या या पुरपरिस्थितीच्या बचावकार्यासाठी तिन्ही संरक्षण दले, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)चे जवान दाखल झाले आहेत. राज्यात नौदलाच्या 42 तर लष्कराच्या 12 तुकड्या मदत व पुनर्वसनाचे काम करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com