पंतप्रधनांवर विश्वास ठेवला अन्...- योगेंद्र यादव

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

रिझर्व्ह बँकेने आता जुन्या नोटा पाच हजारच रुपयेच भरू शकाल असा निर्णय घेतल्याने वारंवार बदलणाऱया नियमांबद्दल नाराजी व्यक्त करत योगेंद्र यादव यांनी पंतप्रधानांच्या निर्णयावर निराश झालो असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली - जुन्या नोटा खात्यावर भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यासाठी मी पैसे भरण्यास थांबले होते. पण, आता पाच हजारांवरील रक्कम भरण्यासाठी स्पष्टीकरण द्यावे लागत असल्याचे, स्वराज अभियान पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेने आता जुन्या नोटा पाच हजारच रुपयेच भरू शकाल असा निर्णय घेतल्याने वारंवार बदलणाऱया नियमांबद्दल नाराजी व्यक्त करत योगेंद्र यादव यांनी पंतप्रधानांच्या निर्णयावर निराश झालो असल्याचे म्हटले आहे.

आरबीआयच्या नवीन नियमानुसार 5000 रुपयांपेक्षा जास्त पैसे जुन्या नोटांच्या स्वरुपात 30 डिसेंबरपर्यंत एकदाच भरता येतील व तसे करताना 8 नोव्हेंबरपासून आतापर्यंत जुन्या नोटा का भरल्या नाही, याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

याबाबत योगेंद्र यादव म्हणाले, की मी माझ्या बँक खात्यात 8 नोव्हेंबरपासून कोणतीही रक्कम जमा केलेली नाही. माझ्याकडे यासाठी कोणतेही विशेष असे उत्तर नाही. मी बँकांसमोरच्या रांगा कमी होण्याची वाट बघत होतो. पंतप्रधान, अर्थमंञी व आरबीआय यांनी आश्वासन दिले होते की पैसे भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत आहे त्यामुळे घाई करण्याची गरज नाही, मी यावर विश्वास ठेवला".