पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा- केजरीवाल

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांतून निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी गुजरातमधील जाहीर सभेत राजकीय भूकंप घडवून आणत थेट पंतप्रधान मोदींवर सहारा कंपनीकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. "सहारा' कंपनीने मोदींना कोट्यवधी रुपये दिले. सहा महिन्यांमध्ये नऊ वेळेस हे पैसे देण्यात आले. "सहारा'मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डायरीमध्ये या पैशांची देवाणघेवाण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, या आरोपानंतर केजरीवाल यांनी अशी मागणी केली आहे.

केजरीवाल म्हणाले, की राहुल गांधी यांनी मोदींवर केलेल्या आरोपांची सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी करण्यात यावी. सहारा आणि बिर्ला समूहाकडून पैसे स्वीकारल्याच्या गंभीर आरोपांची आता चौकशी होणे गरजेचे आहे. मोदींनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा आठ हजार कोटींचा गैरव्यवहार आहे. आपल्या श्रीमंत मित्रांचे कर्ज माफ करण्यासाठी मोदींनी हा निर्णय घेतला असून, या मित्रांकडूनही त्यांनी पैसे घेतले असतील.