संघाने 52 वर्षे तिरंगा लावला नाही- राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

ऋषिकेश- "स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 52 वर्षे होईपर्यंत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या (RSS) नागपूर येथील मुख्यालयात भारताचा तिरंगा झेंडाच नव्हता," असे सांगून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 
"ज्यांनी या तिरंग्यासाठी बंदुकीच्या तीन गोळ्या छातीवर घेतल्या त्यांचे छायाचित्र मोदींनी हटविले," अशा शब्दांत राहुल यांनी खादी दिनदर्शिकेवरील छायाचित्राबाबत खेद व्यक्त केला.

राहुल गांधी म्हणाले, "आर्थिक सुधारणांमध्ये सरकारचा दबाव नको म्हणून रिझर्व्ह बँक ही स्वायत्त संस्था काँग्रेसने उभी केली. मात्र, एका मिनिटात मोदींनी या संस्थेचा खून केला. तुमच्याकडे पेटीएम नसेल तर येथून बाहेर व्हा, असे सांगत मोदींनी पूर्ण देशाला घाबरवून ठेवलेय. 
चरखा हा गरिबांनी गाळलेल्या घामाचे प्रतीक आहे. एकीकडे मोदी चरख्यासोबत छायाचित्र काढतात, परंतु दिवसभर केवळ 50 उद्योगपतींसाठी काम करतात."

ऋषिकेश येथे एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. 'हाताची खूण प्रत्येक धर्मात दिसते,' या वक्तव्याचा राहुल यांनी यावेळी पुनरुच्चार केला. 

"माझा खिसा किंवा कुर्ता फाटला असेल तर मला फरक पडत नाही; परंतु मोदींचे कपडे कधीही फाटलेला नसेल, आणि ते गरिबांच्या नावाने राजकारण करतात." 
"मोदीजी थोडी तपस्या करा, पद्मासनात बसा. जगाला दिसायला पाहिजे की आमच्या पंतप्रधानांनी तपस्या केली आहे, आणि ते योगाचे अँबॅसेडर आहेत.. 'रामलीला'मध्ये श्रीराम मोदींचा मुखवटा घालून येतील," असा चिमटाही राहुल गांधी यांनी काढला. 
'मोदीजी, ज्याप्रमाणे तुम्ही एका मिनिटात नोटाबंदीचा निर्णय घेतला, तसेच 'वन रँक वन पेन्शन' (OROP) योजनेबाबतही तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे,' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

देश

बंगळूर : कर्नाटकच्या पोलिस उपमहानिरीक्षक डी. रूपा यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकास (एसीबी) सादर केलेल्या आणखी एका अहवालामुळे खळबळ...

06.03 AM

नियुक्तीसाठी नवे पाच विभाग कार्मिक मंत्रालयाकडून निश्‍चित नवी दिल्ली: राष्ट्रीय एकात्मतेचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र...

05.03 AM

जनता बेहाल; नेत्यांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप पाटणा: बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत तीनशे जणांचा बळी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017