मोदी कॉन्सर्टमध्ये बोलतात, संसदेत नाही- राहुल

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

सध्या ते फक्त टीव्हीवर बोलतात किंवा कोल्डप्ले सारख्या कार्यक्रमात बोलतात; मग संसदेत का बोलत नाहीत?

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटबंदीच्या निर्णयावर टीव्ही, कोल्डप्लेसारख्या कॉन्सर्टमध्ये बोलतात, पण संसदेत बोलत नाहीत, अशी विखारी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयावरून विरोधी पक्षांकडून सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी संसदेतील चर्चेत सहभागी होण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र, अद्याप पंतप्रधान हिवाळी अधिवेशनात संसदेत उपस्थित राहिलेले नाहीत.

याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य करत पंतप्रधान संसदेत आले तर ते आणखी भावूक होतील. सध्या ते फक्त टीव्हीवर बोलतात किंवा कोल्डप्ले सारख्या कार्यक्रमात बोलतात; मग संसदेत का बोलत नाहीत?