(रशियासारखा) जुना मित्र अधिक महत्त्वाचा:मोदी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016

गोवा - "दोन नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे,‘ सूचक प्रतिपादन भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) ब्रिक्‍स परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर केले. याचबरोबर, दहशतवादाच्या मुद्यावर रशियाकडून भारतास व्यक्त करण्यात आलेल्या ठाम पाठिंब्याचेही पंतप्रधानांनी स्वागत केले. 
 
पंतप्रधानांच्या निवेदनाचा आशय असा - 
 
# भारताचे जुने मित्र असलेल्या पुतीन यांचे भारतामध्ये स्वागत करताना मला अत्यंत आनंद होतो आहे 

# सीमेपलीकडील दहशतवादाचा सर्व भागासच (दक्षिण आशिया) फटका बसतो आहे. तेव्हा दहशतवादास ठाम विरोध करण्यासंदर्भातील रशियाच्या भूमिकेचे स्वागत आहे. रशियाच्या दहशतवादविरोधी धोरणामध्ये भारतीय धोरणाचेच प्रतिबिंब आहे. दहशतवादी व त्यांच्या समर्थकांसाठी अत्यंत कडक धोरण (झिरो टॉलरन्स) राबविण्यास दोन्ही देशांची मान्यता आहे 

# रशियाबरोबरील आर्थिक संबंध अधिकाधिक विकसित करण्यावर भारताचा भर. भारत व रशियामधील उद्योगविश्‍व आता अधिक चांगल्या पद्धतीने जोडले गेले आहे 
 
# भविष्यामधील आवश्‍यकतेचा विचार करुन भारत व रशियासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाची स्थापना करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 
 
# भारत व रशियामधील गेल्या दोन वार्षिक चर्चांनंतर द्विपक्षीय भागीदारी अधिक बळकट झाली आहे. यामुळे भारत व रशियामधील आर्थिक व संरक्षण क्षेत्रातील भागीदारी अधिक समृद्ध होईल