फुंडकरांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची सोशल मिडियावर श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

अकोला - भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर (वय 67) यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदय विकाराने तीव्र झटक्याने निधन झाले. फुंडकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखिल त्यांना सोशल मिडियावरुन श्रद्धांजली वाहिली. 

''महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने मी दुःखी झालो. महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत त्यांनी अमूल्य योगदान दिले. शेतकऱ्यांची सेवा करणारे ते पहिले शेतकरी होते. या दु:खात मी त्यांच्या कुटुंब आणि समर्थकांबरोबर आहे'' असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

''फुंडकर यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकाऱ्याला आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे. शेती आणि सहकारातील प्रश्नांची जाण असलेला नेता आपण गमावला आहे.‬ ‪विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळल्या आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्त-मित्रांच्या, कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भाऊसाहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली''. अशा भावना मुखंयमंत्री‬ देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर व्यक्त केल्या आहेत.

Web Title: PM Narendra modi pays tribute to Bhausaheb Phundkar on Twitter