मोदी, राहुल गांधींचा अहमदाबादमधील रोड शो रद्द

Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra Modi

अहमदाबाद - सुरक्षेच्या कारणास्तव गुजरात पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा अहमदाबाद शहरात होणारा रोड शोला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या नेत्यांचे रोड शो रद्द करण्यात आले आहेत.

अहमदाबादचे पोलिस आयुक्त अनुप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यावरून नागरिकांचे हित पाहता आम्ही भाजप आणि काँग्रेसकडून होणाऱ्या रोड शोला परवानही नाकारली आहे. मंगळवारी या दोन्ही नेत्यांचा रोड शो होणार होता. या दोन्ही पक्षांनी परवानगी मागितली होती.

गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत आहे. मोदी आणि राहुल गांधी यांनी प्रचाराचा धुरळा उडवत चुरस निर्माण केली आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाले असून, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 डिसेंबरला होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com