अभिनंदन! : राहुल गांधींचे ट्विट, मोदींचे रिट्विट!

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

पंजाबमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे फोनवरून अभिनंदन केले.

भाजपला दोन राज्यांत विजय मिळाल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचे जाहीर अभिनंदन केले आहे. राहुल यांची पोस्ट मोदींनी रिट्विट करून त्यांना धन्यवाद दिले आहेत. 

"धन्यवाद. लोकशाही दीर्घायु होवो!" असे मोदींनी राहुल यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. 

राहुल यांचे अभिनंदन नाही!
यूपी, उत्तराखंडमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले असले तरी, पंजाबमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता मिळवली असून, मणिपूर आणि गोवा या राज्यांतही काँग्रेस बहुमताच्या जवळ गेला आहे. 
राहुल यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले असले तरी मोदींनी मात्र त्यांचे थेट अभिनंदन केले नाही. पंजाबमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे फोनवरून अभिनंदन केले. तसेच, अमरिंदर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. 

चार राज्यांमध्ये आम्ही भाजपचे सरकार स्थापन करू असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. पंरतु त्यांचे हे वक्तव्य जरा घाईचे ठरले. त्यानंतर निकालांमधील कौल बदलत गेला. पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ जात असल्याचे चित्र दिसून आले.