मोदींकडून राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

राहुल गांधी हे सध्या भारताबाहेर आहेत. त्यांनी मंगळवारी काही आपल्या आजीसोबत घालविण्यासाठी जात असल्याचे ट्विट करून सांगितले होते. 

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दिर्घ व निरोगी आयुष्य लाभो, ही प्रार्थना करतो. देशभरातून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून त्यांचा वाढदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहेत.

राहुल गांधी हे सध्या भारताबाहेर आहेत. त्यांनी मंगळवारी काही आपल्या आजीसोबत घालविण्यासाठी जात असल्याचे ट्विट करून सांगितले होते.