पंतप्रधानांनी घेतला "नमामी गंगे'चा आढावा

पीटीआय
शनिवार, 20 मे 2017

या अभियानाअंतर्गत सरकारने आत्तापर्यंत कोणकोणती कामे कशा पद्धतीने केली आहेत, याचे सादरीकरण करण्यात आले. गंगेच्या काठावरील गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढविण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (ता. 18) रात्री झालेल्या बैठकीत "नमामी गंगे' या अभियानाचा आढावा घेतला. या अभियानाअंतर्गत सरकारने आत्तापर्यंत कोणकोणती कामे कशा पद्धतीने केली आहेत, याचे सादरीकरण करण्यात आले.

गंगेच्या काठावरील गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढविण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, पाटणा, भागलपूर, हावडा आणि कोलकता या प्रमुख ठिकाणी गंगा दूषित होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले. या वेळी पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी, निती आयोगाचे अधिकारी, जल संसाधन कार्यालय, पेयजल मंत्रालय, तसेच स्वच्छ गंगा आणि मध्यवर्ती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.