'PoK तील बांधवांना सोडविण्यात येईल'
नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या आपल्या बांधवांना सोडविण्यात येईल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले आहे.
नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या आपल्या बांधवांना सोडविण्यात येईल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना सिंह म्हणाले, "स्वातंत्र्यची एक लढाई अद्याप बाकी आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील आपल्या बांधवांना स्वातंत्र्य मिळवून द्यायचे आहे.‘ जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबतही सिंह यांनी माहिती दिली. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू-काश्मीरचाच भाग असल्याचे म्हटले आहे. "राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही असा आणि जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना तसा विश्वास वाटत आहे‘, असे सिंह म्हणाले. पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मिरसह बलुाचिस्तानमधील नागरिकांवर होत अत्याचाराचे उत्तर जगासमोर द्यावेच लागेल. असेही सिंह म्हणाले.