श्रीनगर: फरार दहशतवाद्याच्या गोळीबारात पोलिस जवान मृत

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

या दहशतवाद्यास श्रीनगरमधील रुग्णालयात तपासणीसाठी नेले जात असताना त्याने संधी साधून पळ काढला. याचवेळी त्याने एका पोलिस जवानाकडून शस्त्र हिसकावून घेत गोळीबार केला. या गोळीबारात आणखी एक जवान जखमी झाला.
नावेद असे या दहशतवाद्याचे नाव आहे

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर पोलिस दलाच्या ताब्यातून फरार झालेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात एका पोलिस जवानाचा मृत्यु झाला.

या दहशतवाद्यास श्रीनगरमधील रुग्णालयात तपासणीसाठी नेले जात असताना त्याने संधी साधून पळ काढला. याचवेळी त्याने एका पोलिस जवानाकडून शस्त्र हिसकावून घेत गोळीबार केला. या गोळीबारात आणखी एक जवान जखमी झाला.
नावेद असे या दहशतवाद्याचे नाव आहे. नावेद याला पळून जाण्यासाठी रुग्णालयामधूनच मदत झाली असण्याच्या शक्‍यतेची पोलिस तपासणी करत आहेत.

नावेद याचा आता कसून शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Policeman Killed In Firing In Srinagar Hospital, Pak Terrorist Escapes