शिवपाल यांची वेगळी आघाडी

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

लखनौ: अखिलेश यांच्यापासून वेगळे होत समाजवादी पक्षाचे माजी नेते शिवपाल यादव यांनी आज "समाजवादी सेक्‍युलर फ्रंट' या वेगळ्या आघाडीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलायमसिंह यादव हेच या आघाडीचे अध्यक्ष असतील.

याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच केली जाणार आहे. आपला पक्ष हा वेगळा राजकीय पक्ष नसून ती केवळ आघाडी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लखनौमध्ये होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा केली जाणार आहे. जे पक्ष समाजवादी पक्षापासून दूर गेले होते त्यांना या आघाडीच्या माध्यमातून एकत्र आणले जाईल, असेही शिवपाल यांनी नमूद केले.