पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; महिला जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार होत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने कृष्णा घाटी सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता.

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत शुक्रवारी मध्यरात्री पुँच सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सीमेवरील गावातील एक महिला जखमी झाली आहे.

शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर व सीमेवरील गावांवर गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात एकही जवान जखमी झालेला नाही. मात्र, सीमेवरील शाहपूर केरनी भागातील एक महिला जखमी झाली आहे. 

पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार होत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने कृष्णा घाटी सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता.