अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज (सोमवार) अमेठी दौऱ्यावर असून, यापूर्वीच याठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये राहुल गांधींना 'श्री राम' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाच्या स्वरुपात दाखवण्यात आले आहे.
राहुल गांधी यांच्या अमेठी दौऱ्याच्या एक दिवसापूर्वी रविवारी ही वादग्रस्त पोस्टरबाजी करण्यात आली. गौरीगंज रेल्वे स्टेशन परिसरात हे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये राहुल गांधी धनुष्य बाण घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत असल्याचे दाखवण्यात आले आहे. 'राहुल में भगवान राम का अवतार, 2019 में आएगा राहुल राज (रामराज)।',असे या पोस्टरवर लिहिण्यात आलेले आहे.
राहुल गांधी आज आणि उद्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी त्यांचे जंगी स्वागत होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर प्रथमच ते अमेठी दौऱ्यावर जात आहेत. हे वादग्रस्त पोस्टर अभय शुक्ला नावाच्या एका स्थानिकाने लावले आहे. शुक्लाने काँग्रेस पक्षासोबत कोणतेही संबंध नसल्याचे सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.