कानपूर हिंसाचार : ४० संशयितांची पोस्टर जारी; मदत करण्याचे आवाहन

Posters of 40 suspects in Kanpur violence released
Posters of 40 suspects in Kanpur violence releasedPosters of 40 suspects in Kanpur violence released

कानपूर : पोलिसांनी ३ जून रोजी गोंधळ (Kanpur Violence) घालण्यात सहभागी असलेल्या ४० संशयितांची पोस्टर सोमवारी (ता. ६) जारी केली आहेत. कानपूर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेज स्कॅन केल्यानंतर संशयितांची छायाचित्रे जारी केली. तसेच संशयितांना शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. पोलिसांनी माहिती देण्यासाठी इन्स्पेक्टर बेकनगंज यांचा मोबाईल क्रमांक (९४५४४०३७१५) देखील जारी केला. (Posters of 40 suspects in Kanpur violence released)

हिंसाचाराचा (Kanpur Violence) आरोप असलेल्यांची छायाचित्रे असलेली होर्डिंग्ज (Hoardings) महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात येण्याची ही तिसरी वेळ आहे. २०१५ मध्ये सिसामाऊ येथे पहिल्यांदा असे होर्डिंग लावले होते. डिसेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधादरम्यानही अशीच कारवाई करण्यात आली होती.

मार्च २०२० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना होर्डिंग हटवण्याचे निर्देश दिले होते. तेव्हा न्यायालयाने राज्य सरकारची ही कृती संविधानाच्या कलम २१ चे उल्लंघन आणि लोकांच्या गोपनीयतेचे अनिष्ट उल्लंघन असल्याचे मानले होते.

Posters of 40 suspects in Kanpur violence released
Agni-4 Missile : भारताने घेतली अग्नी-४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

आतापर्यंत ३८ जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या पेट्रोल पंपावरून उघड्यावर पेट्रोल टाकण्यात आले त्या पेट्रोल पंपावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आम्ही अद्याप कोणतेही पोस्टर रिलीज केलेले नाही. पोलिस या छायाचित्राची ओळख पटवत आहेत, असे कानपूरचे सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितले.

सपा नेते निजाम कुरेशी यांचे नाव पुढे आले

गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये निजाम कुरेशीचे नाव आहे. निजाम कुरेशी हे जोहर फॅन्स असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. ते सपाचे नेते असल्याचेही बोलले जात आहे. निजामने सपा नेत्यांसोबतचे फोटोही फेसबुकवर पोस्ट केले आहेत. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. काही लोक सोशल मीडियावर अफवा पसरवत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. एकीकडे लाचार असल्याचे दाखवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com