कुशल तरुणच गरिबी हटवू शकतो - नरेंद्र मोदी

पीटीआय
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

नया रायपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा गरिबांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा लावून धरत कुशल तरुणच स्वत:ला गरिबीतून बाहेर काढू शकतात, तेच प्रगतीच्या इंजिनाचे इंधन असल्याचे प्रतिपादन केले आहे.

छत्तीसगडमध्ये ईको पर्यटनाच्या विकासाला पोषक वातावरण असून, यामध्ये जर भांडवल गुंतविण्यात आले तर त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. छत्तीसगडच्या 16 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी ही बाब मांडली.

मोदींनी या वेळी कौशल्य विकासाचा मुद्दा "मेक इन इंडिया प्रकल्पा'शी जोडला, मुबलक प्रमाणामध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बुस्टर डोस मिळू शकतो, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. गरिबीच्या गाळातून लोकांना वर काढणे हे सरकारचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या "जंगल सफारी' या उपक्रमाचे मोदींच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. राज्यामध्ये ईको पर्यटन वाढल्यास ऑटोरिक्षा चालक, फळविक्रेते आणि चहावाल्यांची कमाई वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

जंगल सफारी हे कमाईचे साधन
लहान राज्यांसाठी जंगल सफारी हे कमाईचे साधन असून, छत्तीसगडसारख्या राज्यांना याचा मोठा लाभ होऊ शकतो. राज्यामधील अगदी छोट्या भूभागाचादेखील शेतीसाठी वापर केला जावा. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. विविध राज्यांत विकासाच्या योजना राबवीत असताना केंद्र सरकार कोणालाही सापत्न वागणूक देणार नाही, सगळ्यांना विकासाचा मुबलक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी मोदींच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

Web Title: Poverty can delete skilled youth