...म्हणून डॉ. कलामांच्या शाळेतील वीज कापली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेतील वीज गायब झाली आहे. शाळा प्रशासनाने वीज बिलाची रक्कम भरली नसल्याने वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून शाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : देशाचे 'मिसाइल मॅन' अशी ओळख असलेले माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेतील वीज गायब झाली आहे. शाळा प्रशासनाने वीज बिलाची रक्कम भरली नसल्याने वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून शाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

dr. apj abdul kalam

तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे मंडपम पंचायत युनियन मेडिकल स्कूल आहे. या शाळेत डॉ. कलामांनी शिक्षण घेतले होते. मागील दोन वर्षांपासून शाळा प्रशासनाने वीज बिल भरले नाही. त्यामुळे आता ही थकीत रक्कम 10 हजार रुपयांपर्यंत गेली आहे. यापूर्वी शाळेचे वीज बिल ग्रामीण शिक्षण समितीच्या माध्यमातून भरण्यात येत होते. त्यानंतर या समितीने शाळा प्रशासनाला वीज बिल भरण्यास सांगितले होते. शाळा प्रशासनाने वीज बिल भरण्यास सुरवात केली होती. 

मात्र, काही महिन्यानंतर हे वीज बिल भरण्यात आले नाही. त्यामुळे अखेर वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून शाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. याबाबत ग्रामीण समितीचे अध्यक्षांनी सांगितले, की वीज कंपनीशी याबाबत चर्चा झाल्यानंतर फक्त 5 दिवसांसाठी वीज देण्याबाबत चर्चा झाली होती.  

Web Title: Power Supply Cut By Company Of School Where Former President Dr Kalam Studied