भाजप सत्तेत आला की प्रजापतींना अटक होईल : कलराज मिश्रा

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

रजापती यांच्याविरोधात एका महिलेवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या मुलीच्या विनयभंगाची तक्रार दाखल झाली आहे. त्यानंतर प्रजापती यांचे पारपत्र जप्त करण्यात आले असून त्यांना "लूक आऊट' नोटीसही बजावण्यात आली आहे. मात्र त्यानंतर ते फरार असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना मिश्रा म्हणाले, "प्रजापती यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. अकरा मार्च रोजी आमच्या पक्षाची सत्ता आल्यानंतरच त्यांना अटक करण्यात येईल.'

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली की बलात्काराचे आरोप असलेले उत्तर प्रदेशचे मंत्री गायत्री प्रजापती यांना अटक करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांनी जाहीर केले आहे.

प्रजापती यांच्याविरोधात एका महिलेवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या मुलीच्या विनयभंगाची तक्रार दाखल झाली आहे. त्यानंतर प्रजापती यांचे पारपत्र जप्त करण्यात आले असून त्यांना "लूक आऊट' नोटीसही बजावण्यात आली आहे. मात्र त्यानंतर ते फरार असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना मिश्रा म्हणाले, "प्रजापती यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. अकरा मार्च रोजी आमच्या पक्षाची सत्ता आल्यानंतरच त्यांना अटक करण्यात येईल.' उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सरकार प्रजापती यांना संरक्षण पुरवित असल्याचा आरोपही मिश्रा यांनी यावेळी केला.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनीही "बलात्काराचा आरोप असलेले वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती यांना अजूनही मंत्रिमंडळात स्थान कसे काय?' अशी थेट विचारणा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे केली आहे. समाजवादी पक्षाकडून प्रजापती यांना मिळत असलेल्या संरक्षणाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जौनपूर येथील प्रचारसभेत केला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्यपालांनी राज्य सरकारची केलेली कानउघडणी अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.