विवाहित विद्यार्थिनींना 45 दिवसांची प्रसूती रजा

यूएनआय
मंगळवार, 13 जून 2017

चंडीगड - हरियानातील महाविद्यालये व विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विवाहितांना 45 दिवस प्रसूती रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी जाहीर केला. गर्भवती विद्यार्थिनींच्या शिक्षणात खंड पडू नये किंवा विनाअडथळा त्यांना शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भातील मार्गदर्शक आराखड्यास मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नुकतीच मंजुरी दिली. ""या मार्गदर्शिकेनुसार विवाहित विद्यार्थिनीला एका वेळी सलग 45 दिवस प्रसूती रजा घेता येईल. यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून विभागप्रमुखांची परवानगी घ्यावी लागेल. या रजेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींना संबंधित शैक्षणिक संस्थांमधील वर्गांना उपस्थित राहण्याचे कोणतेही बंधन नसले तरी, नियोजित सर्व प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतील,'' अशी माहिती शिक्षणमंत्री रामविलास शर्मा यांनी दिली.