विवाह समारंभावेळी गोळीबार; गर्भवती ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

भटिंदा (पंजाब)- विवाह समारंभावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी झालेल्या गोळीबारात एक गर्भवती युवती ठार झाली आहे. संबंधित घटनेचे एकाने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौर मंदी या गावामध्ये विवाह समारंभानंतर मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकजण नृत्य करत होते. नृत्य करणाऱयांमध्ये गर्भवती असलेल्या कुलवींदर कौर (वय 25) या युवतीचाही समावेश होता. यावेळी एकजण हवेत गोळीबार करत होता. गोळी सुटल्यानंतर कौर यांच्या शरीरात घुसली. यामध्ये कौर यांचा जागीच मृत्यू झाला. संबंधित छायाचित्रण एकाने मोबाईलमध्ये कैद केले आहे.

दरम्यान, गोळीबार करणाऱयाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून पिस्तूल ताब्यात घेण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.