राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे मोदींची 'मन की बात' : सप

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेले अभिभाषण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' असल्याची टीका समाजवादी पक्षाने केली आहे.

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेले अभिभाषण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' असल्याची टीका समाजवादी पक्षाने केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर टीका केली आहे. तर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, "आज सर्व जण कॅशलेस झाले आहेत. मोदींनी "सबका पैसा, सरकार का विकास' हे ध्येय साध्य केल्याने आज ते आनंदात असतील. आता ते विधान बदलत आहेत. 31 डिसेंबरच्या भाषणानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती चार वेळा वाढल्या आहेत. जर याला विकास म्हणत असतील, आम्ही प्रभावित झालो आहोत', अशी टीका चौधरी यांनी केली.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, 'सरकारने रोजगारनिर्मितीसाठी काहीही केलेले नाही. माझ्यामते, हे सरकार रोजगारनिर्मितीमध्ये संपूर्णपणे अपयशी ठरले आहे.' शिवाय काँग्रेस नेते अहमद पटेल आणि सीपीआयचे नेते डी राजा यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.

Web Title: Presidents speech is PM's 'Man Ki Baat'