रुस्तम-2 च्या प्राथमिक चाचण्या यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

"कावेरी'बाबतही फेरविचार
लढाऊ विमानांसाठी तयार केलेले; मात्र अपेक्षा पूर्ण न झाल्याने अडगळीत पडलेल्या स्वदेशी बनावटीच्या "कावेरी' इंजिन प्रकल्पाबाबतही फेरविचार केला जात आहे. खासगी कंपन्यांच्या सहकार्याने इतर कारणांसाठी, जसे रेल्वेसाठी वीजनिर्मिती, वापर करण्याबाबत संशोधन सुरू असल्याचे "डीआरडीओ'ने सांगितले.

बंगळूर : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी बनावटीच्या मानवरहित ड्रोनची निर्मिती केली असून, त्याच्या सुरवातीच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. "रुस्तम-2' असे या ड्रोनचे नाव असून, त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्याने उत्साह वाढलेल्या "डीआरडीओ'ने अशा दहा ड्रोनची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आगामी काळात हे ड्रोन भारतीय लष्करात दाखल करण्याबाबतही आम्हाला आशा आहे, असे "डीआरडीओ'चे महासंचालक एस. ख्रिस्तोफर यांनी सांगितले.

ख्रिस्तोफर यांनी आज एका पत्रकार परिषदेत "डीआरडीओ'मधील सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ""रुस्तम-2 या ड्रोनलाच "तापस-201' असे नाव देण्यात आले आहे. हे मध्यम उंचीवरून उडू शकणारे आणि दीर्घ पल्ल्यासाठी उपयुक्त ड्रोन विमान आहे. या ड्रोनच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. हा प्रकल्प 1500 कोटी रुपयांचा आहे. सध्या या ड्रोनवर अनेक चाचण्या घ्यायच्या असून, काही बदलही करायचा आहे. यानंतर लष्करात दाखल करण्याबाबत आशा करता येईल.'' या ड्रोनच्या लढाऊ क्षमतेबाबत "डीआरडीओ'ने मौन बाळगले असले, तरी त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅक्‍टिकल एअरबॉर्न प्लॅटफॉर्म बियॉंड हॉरिझॉन-201 (तापस-बीएच 201) म्हणजेच रुस्तम-2 हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मेक इन इंडिया' धोरणाचाच भाग असून, हा प्रकल्प यशस्वी झाल्यास उत्पादन वेगाने सुरू करण्याचा "डीआरडीओ'चा विचार आहे. "रुस्तम-2'ची आणखी नऊ मॉडेल तयार केल्यानंतर त्यांची चाचणी होईल आणि त्यानंतर त्याला मान्यता मिळविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

"तेजस' अधिक विकसित करणार
हवाई दलाने आणखी 83 स्वदेशी बनावटीच्या "तेजस' लढाऊ विमानांची मागणी केली असल्याचे ख्रिस्तोफर यांनी सांगितले. त्यांना लवकरात लवकर ही विमाने पुरवितानाच त्यांच्या उड्डाण आणि शस्त्र क्षमतेत अधिक सुधारणाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

"कावेरी'बाबतही फेरविचार
लढाऊ विमानांसाठी तयार केलेले; मात्र अपेक्षा पूर्ण न झाल्याने अडगळीत पडलेल्या स्वदेशी बनावटीच्या "कावेरी' इंजिन प्रकल्पाबाबतही फेरविचार केला जात आहे. खासगी कंपन्यांच्या सहकार्याने इतर कारणांसाठी, जसे रेल्वेसाठी वीजनिर्मिती, वापर करण्याबाबत संशोधन सुरू असल्याचे "डीआरडीओ'ने सांगितले.

अजून एक वर्ष सातत्यपूर्ण काम करत "डीआरडीओ'ला उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. यासाठी आमचे युवा अभियंते कठोर प्रयत्न करत आहेत. लष्कराकडून अधिकृत मागणी मिळविण्याची आणि राष्ट्राच्या सेवेत उपयोगी पडण्याची "रुस्तम-2'ला आशा आहे.
- एस. ख्रिस्तोफर, "डीआरडीओ'चे महासंचालक

देश

लखनौ : "ईदचा नमाज रस्त्यांवर पढण्यापासून रोखू शकत नाही, तर पोलिस ठाण्यांत, पोलिस लाईनमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यावर...

10.45 AM

मुझफ्फरनगर : प्रेयसीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची...

10.28 AM

जरंडी : वेताळवाडीच्या जंगलातून शहर परिसरात बुधवारी (ता. १६) भरदिवसा बिबट्याच्या दोन नवजात पिलांनी शहराच्या हाकेच्या अंतरावर...

10.27 AM