"तारिणी'च्या सागरकन्यांचे पंतप्रधानांकडून कौतुक 

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

भारतीय नौदलाच्या सहा महिला अधिकाऱ्यांच्या चमूने "आयएनएसव्ही तारिणी' या नौकेतून जगाला गवसणी घातली. या सागरी कन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेतली. पंतप्रधानांनी आगळ्या पराक्रमाचे त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले, असे पंतप्रधान कार्यालयातून काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. 

नवी दिल्ली -  भारतीय नौदलाच्या सहा महिला अधिकाऱ्यांच्या चमूने "आयएनएसव्ही तारिणी' या नौकेतून जगाला गवसणी घातली. या सागरी कन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेतली. पंतप्रधानांनी आगळ्या पराक्रमाचे त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले, असे पंतप्रधान कार्यालयातून काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. 

भारताच्या नौदलातील महिला अधिकाऱ्यांनी एकत्र येत "नाविका सागर परिक्रमा' द्वारे केलेली ही पहिलीच जगप्रदक्षिणा आहे. पंतप्रधान मोदी यांना भेटल्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी त्यांना परिक्रमेची माहिती दिली. या थरारक प्रवासाविषयी लिहिण्याचे व अनुभव कथन करण्याचे आवाहन मोदी यांनी त्यांना केले. 

Web Title: Prime Minister modi Appreciation for indian navy women