पंतप्रधान मोदींची 'लोकप्रियता' घटली 3 लाख फॉलोअर्सने !

Prime Minister Modis popularity decreased by 3 lakh followers
Prime Minister Modis popularity decreased by 3 lakh followers

नवी दिल्ली : फेसबुक, व्हॉटस्अप यांसारख्या सोशल मीडियाचा भाग असलेल्या ट्विटरवर अनेक युजर्स अॅक्टिव्ह असतात. मात्र, टि्वटरने आज (शुक्रवार) ट्विटर अकाऊंटची 'स्वच्छता मोहीम' राबविली. यामध्ये अॅक्टिव्ह नसलेले आणि लॉक करण्यात आलेले अकाऊंट बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकप्रियतेत प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल 3 लाखांनी घटली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ट्विटरवर अनेक युजर्स अॅक्टिव्ह (इनअॅक्टिव्ह) नव्हते तर काही युजर्सची अकाऊंट बंद करण्यात आली होती. ही बाब समजल्यानंतर ट्विटर व्यवस्थापनाने अशा इनअॅक्टिव्ह आणि लॉक करण्यात आलेले अकाऊंट पूर्णपणे बंद केली आहेत. या बंद करण्यात आलेल्या अकाऊंटमध्ये पंतप्रधान मोदींच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल 3 लाखाने घटली. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची फॉलोअर्सची संख्या 17 हजारांनी घटल्याचे समोर आले. 

SocialBlade.com या संकेतस्थळानुसार, पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक ट्विटर हँडलने (@narendramodi) 2, 84, 746 फॉलोअर्स गमावले. तर त्यांच्या कार्यालयीन ट्विटर हँडलने (@PMOIndia) 1,40,635 फॉलोअर्स गमावले. तसेच राहुल गांधींच्या फॉलोअर्स संख्येत 17,503 ने तर काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या फॉलोअर्स संख्येत 1,51,509 ने घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com