प.बंगालमध्ये पुजा करणेही कठीण - नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

मिदनापूर : ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची अवस्था डाव्यांची सत्ता असतानापेक्षा जास्त वाईट झाली आहे. या राज्यात पुजा करणेही कठीण होऊन बसले असून, राज्यात लोकशाही रक्ताने बरबटली आहे. माँ-माटी-मानुष ही घोषणासुद्धा हवेत विरून गेली असल्याची टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहे. येथील मिदनापूर येथे झालेल्या भाषणात ते बोलत होते.

विरोध करणाऱ्यांची हत्या करा असा, गटच इथे निर्माण करण्यात आला आहे. त्यांच्या परवानगीशिवाय येथील एक पानही हालत नाही. यामुळे पश्चिम बंगालची अवस्था बिकट झाली असून, सामान्य माणूस दहशतीखाली आहे. या राज्यात सत्तेत राहण्यासाठी एका विशिष्ट समूहाचा वापर केला जातो. तरुणांच्या रोजगारासाठी, शेतकऱ्यांसाठी ममता सरकार काहीही करू शकले नाही. महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी इथे लाच द्यावी लागत असून, या राज्यात भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणावर वाढला  असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यावर निशाना साधताना मोदी म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचे हाल सुरू असून, केंद्र सरकारने केलेल्या मदतीमुळेच माझ्या स्वागतासाठी ममता सरकारने मोठ्या प्रमाणावर झेंड झावले आहेत. त्याच्यावरील फोटो पाहून असे वाटते की ममता बॅनर्जी स्वतः हात जोडून माझ्या भाषणासाठी उभ्या आहेत.

Web Title: prime minister Narendra Modi criticize mamta banarji