पंतप्रधान धमकवत आहेत - ममता 

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोटबंदीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या पक्षांना धमकावत असल्याचा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच नोटबंदीबाबत केंद्राने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध उद्या दिल्लीत रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

राज्य सचिवालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

पंतप्रधानांनी पंतप्रधानासारखे वागायला हवे. परंतु हे पंतप्रधान इतर पक्षांना धमकवत आहेत, त्यांनी या मुद्‌द्‌यावर सर्वपक्षीय बैठक बोलाविली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. नोटबंदीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या काही राजकीय पक्षांना पंतप्रधान धमकावत असल्याने त्यांचा आवाज दबला आहे; परंतु मी निषेध थांबविणार नाही. ते मला तुरुंगातही टाकू शकतात. मुळात यामध्ये अहंकाराची लढाई नाही, या निर्णयापूर्वी कृती योजनेची गरज होती, हा प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणे आवश्‍यक आहे. कारण याचा मोठा परिणाम सामान्य जनतेला सहन करावा लागत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

देश

लखनौ : "ईदचा नमाज रस्त्यांवर पढण्यापासून रोखू शकत नाही, तर पोलिस ठाण्यांत, पोलिस लाईनमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यावर...

10.45 AM

मुझफ्फरनगर : प्रेयसीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची...

10.28 AM

जरंडी : वेताळवाडीच्या जंगलातून शहर परिसरात बुधवारी (ता. १६) भरदिवसा बिबट्याच्या दोन नवजात पिलांनी शहराच्या हाकेच्या अंतरावर...

10.27 AM