हवा होता 'शाहरुख', मिळाला 'गब्बर'- राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

रायबरेली (उत्तर प्रदेश)- दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (डीडीएलजे) चित्रपटातील आश्वासने पाळणारा शाहरुख हवा होता. परंतु, शोले चित्रपटातील गब्बर मिळाला, अशा शब्दात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीतील प्रचाराच्या तिसऱया टप्प्यात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी सहभागी झाल्या आहेत. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधानांनी नोटाबंदी करून जनतेच्या पैशामधून विजय मल्ल्या यांचे कर्ज माफ केले आहे. भारतात कचरा असल्याचे सांगतात. तुम्हाला साफ करण्यास सांगून ते अमेरिकेत निघून जातात. अमेरिकेतून आल्यानंतर कचरा साफ झाला की नाही हे तपासणार असल्याचे सांगतात. मोदी देशाला नाव ठेवत आहेत. मोदींनी निवडणूकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन पाळलेले नाही. आपल्याला 'डीडीएलजे' चित्रपटातील शाहरुख हवा होता. परंतु, अडीच वर्षानंतर शोले चित्रपटातील गब्बर मिळाला आहे.'

'काँगेस व समाजवादी पक्षाला मतदान केल्यास आमचे सरकार शेतकरी व महिलांसाठी काम करेल. शेतकऱयांना मंदीचा मोठा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱयांचा माल थेट कंपन्यांना विकून योग्य भाव देण्याचे काम आम्ही करू. राज्यात फुड पार्क सारख्या 40 कंपन्या उभारू. मोदींनी येथील शेतकऱयांसाठी कोणतेही काम केलेले नाही. आमचे सरकार आल्यास शेतकऱयांचे कर्ज माफ करेल,' असेही गांधी म्हणाले.