PUBG हत्याकांडात नवा ट्विस्ट; आईच्या हत्येनंतर आरोपी मुलगा कोणाला भेटायला गेला होता?

Crime News
Crime NewsSakal Digital
Summary

पब्जीसाठी अल्पवयीन मुलानं आईची हत्या केल्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

आई पब्जी (PUBG) खेळायला देत नाही याचा राग मनात ठेवून उत्तर प्रदेशातल्या राजधानी लखनौच्या (Lukhnow) एका मुलानं आपल्या जन्मदात्या आईचा (Mother) खून केला होता. खून केल्यानंतर हा मुलगा तीन ते चार दिवस आपल्या सख्ख्या बहिणीसोबत घरातच होता. त्यानं आपल्या बहिणीलाही याबाबत कुणाला काही सांगितलंस तर तुझीही अशीच अवस्था करेन, अशी धमकी दिली होती.

उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौमध्ये अल्पवयीन मुलानं आईची हत्या केल्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. महिलेच्या हत्येवर तिसऱ्या एका सदस्याची नजर होती, असं सांगण्यात येतंय. हत्येनंतर आरोपी मुलगा दुपारी दोन वाजता स्कूटी घेऊन या हत्येवर नजर असणाऱ्या व्यक्तीला भेटायला गेल्याचं बोललं जातंय.

Crime News
बुर्किना फासोमध्ये दहशतवाद्यांनी 55 नागरिकांना मारलं ठार

हत्येतील एकमेव प्रत्यक्षदर्शी म्हणजेच, आरोपी मुलाच्या बहिणीनं हा खुलासा केलाय. आईच्या हत्येनंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भैय्या स्कूटी घेऊन कोणालातरी भेटायला गेला असता, त्यानं या संपूर्ण घटनेची माहिती दिलीय. बहिणीनं कुटुंबीयांना सांगितलं की, 'भैय्यानं रात्री दोन वाजता मला खोलीत बंद करून कोणालातरी भेटायला गेला होता.' कुटुंबातील एका नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार, मुलामध्ये आईच्या विरोधात द्वेष भरला होता आणि वडील प्रत्येक गोष्टीत आपल्या अल्पवयीन मुलाला पाठिंबा देत असत. मुलानं चूक केली तर आई शिवीगाळ करायची, पण वडिलांनी त्याला साथ दिली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, 'एका षडयंत्राखाली मुलाला पुढं आणण्यात आलं आणि द्वेषातून त्यानं ही संपूर्ण घटना घडवून आणलीय.'

Crime News
Presidential Election : विरोधी पक्षांकडून शरद पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न

'आईच्या हत्येमागं दुसऱ्याचा कट'

आईच्या हत्येमागं आणखी कोणाचा हात आहे, याचा लवकरच उलगडा करणार आहोत, असं नातेवाइकांनी सांगितलंय. याआधी आरोपी मुलाची चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश बाल संरक्षण आयोगाच्या पथकानं सांगितलं होतं की, मुलाला विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमुळं मुलानंच आईची हत्या केली असावी, असा संशय निर्माण झाला होता. आता बाल संरक्षण आयोगाची संशोधन शाखा या प्रकरणाची चौकशी करून मुख्य आरोपी शोधणार आहे. आतापर्यंत आयोगाच्या पथकानं चौकशीदरम्यान मुलावर हत्येचा संशय व्यक्त केलाय. दरम्यान, 'बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या सुचिता यांच्या म्हणण्यानुसार, मुलाचा वारंवार आईवर रोष होता, त्यामुळं त्यानं हे कृत्य केलं असावं. विदेशी पिस्तुलातून मुलानं आईवर गोळीबार केला असून यामागचं कारण स्पष्ट झालेलं नाहीय.' सुचिता पुढं म्हणाल्या, आमची रिसर्च टीम या मुलाचं प्रकरण हाताळेल. यामध्ये 2 मानसशास्त्रज्ञ, 2 वकील, 2 डॉक्टर आणि 2 बाल संरक्षण आयोगाचे लोक समोरासमोर बसून विश्लेषण करतील. आम्ही पहिल्यांदाच एक संशोधन शाखा स्थापन केलीय. कारण, हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com