पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात 2 जवान हुतात्मा, 5 जखमी

वृत्तसंस्था
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पुलवामा जिल्ह्यातील पोलिस लाईन भागात आज (शनिवार) पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात विशेष कारवाई पथकातील एक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक जवान हुतात्मा झाला आहे. तर, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे चार आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 2 जवान हुतात्मा झाले असून, पाच जवान जखमी झाले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील पोलिस लाईन भागात आज (शनिवार) पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात विशेष कारवाई पथकातील एक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक जवान हुतात्मा झाला आहे. तर, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे चार आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस लाईनमधील 36 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

पोलिस लाईन परिसरात दोन-तीन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. लष्कराचे जवान आणि पोलिसांकडून परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे.