पुणे जिल्ह्यातील 183 गावांची 'जलयुक्त'साठी निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

सासवड - शेतशिवारातील टंचाई हटवून पाणीसाठे व भूजलसाठे वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान गेली दोन वर्षे राबविले जात आहे. यंदा तिसऱ्या वर्षी या कामांसाठी पुणे जिल्ह्यातील 183 गावे निवडण्यात आली आहेत.

सासवड - शेतशिवारातील टंचाई हटवून पाणीसाठे व भूजलसाठे वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान गेली दोन वर्षे राबविले जात आहे. यंदा तिसऱ्या वर्षी या कामांसाठी पुणे जिल्ह्यातील 183 गावे निवडण्यात आली आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी पुरंदरच्या दौऱ्यात ही माहिती दिली. यंदा प्राथमिक यादीत तब्बल 17 गावे नुकतीच वाढली. राज्यात गेली काही वर्षे पाणीटंचाई तीव्र होती. त्यातून शासनाने दोन वर्षांपासून जलयुक्त अभियान राबविले. त्यातून पहिल्या वर्षी (2015-16) पुणे जिल्ह्यातील 200 गावे, दुसऱ्या वर्षी (2016-17) 190 गावे निवडून तिथे सलग समतल चर, बांधबंदिस्ती, मातीनाला बांध, साखळी सिमेंट बंधारे व इतर बंधारे, नाला खोलीकरण - रुंदीकरण, गाळ काढणे, पाझर तलाव, कालवा दुरुस्ती अशी विविध जलमृद्‌ संधारणाची कामे झाली. यंदाही निवडलेल्या या गावामध्ये अशीच गतिमान कामे होतील. जिल्ह्यात सर्वाधिक बारामती, पुरंदर, मावळ तालुक्‍यातील प्रत्येकी 19 गावांची निवड झालीआहे.

'जलयुक्त'साठी निवडलेली गावे पुढीलप्रमाणे
बारामती (गावे 19) : जळगाव सुपे, कऱ्हावागज, अंजनगाव, मासाळवाडी, मुढाळे, ढाकाळे, मोढवे, कानावाडी, बऱ्हाणपूर, कारखेल, सोनकसवाडी, नेपतवळण, माळवाडी, मगरवाडी, चौधरवाडी, कोळोली, आंबी बु., सावळ, निबोडी.
पुरंदर (गावे 19) : मावडी क. प., बोपगाव, वीर, जेऊर, शिंदेवाडी- खेंगरेवाडी, माहूर, वाघापूर, आंबळे, रिसे, पिसे, मावडी सुपे, चांबळी, उदाचीवाडी, झेडेवाडी, सुपे खुर्द, अस्करवाडी, हरगुडे, कोडित, थापे वारवडी.
इंदापूर (गावे 15) : गलांडवाडी 2, तरंगवाडी, बळपुडी, निमसाखर, पंधारवाडी, रेडणी, झगडेवाडी, घोरपडवाडी, पिठकेश्वर, निरनिमगाव, पिल्लेवाडी, गोसावीवाडी, मराडेवाडी, गोतोंडी, निबोडी.
शिरूर (गावे 15) : वढु बु., कासारी, टाकळी हाजी, दहिवडी, गोलेगाव, पारोडी, निमगाव दुडे, रावडेवाडी, खंडाळे, आंधळगाव, उरळगाव, सरदवाडी, इचकेवाडी, पिंपळे खालसा, आलेगाव पागा.
जुन्नर (गावे 16) : खामुंडी, आळेफाटा, कुरण, औरंपूर, बोरी बु., पारगावतर्फे आळे, काळवाडी, वडगाव कांदळी, घोडे माळ, इंगळूण, हातवीज, जळवंडी, सुराळे, निरगुडे, निमगाव सावा, बल्लाळवाडी.
आंबेगाव (गावे 16) : आहुपे, पिपरगणे, जांभोरी, गोहे खु., पोखरकरवाडी, गंगापूर खुर्द, कोटमदरा, ठाकरवाडी, लांडेवाडी, महाळुंगे पडवळ, टाकेवाडी, निघोटवाडी, जाधववाडी, थोरांदळे, वळती, पोंदेवाडी.
खेड (गावे 16) : आढे, तोरणे खु., कोहिडे बु., पाळू, रेटवडी, पूर, गुळाणी, जरेवाडी, वरची भांबुरवाडी, दावडी, जऊळके खु., येणवे बु., धुवोली - वांजळे, कडधे, एकलहरे, भलवडी.
हवेली (गावे) : सोनापूर, नांदोशी, मणेरवाडी, गाऊडदरा, उरुळी कांचन, वडाचीवाडी, तुळापूर, होळकरवाडी, भावडी, बहुली, बिवरी, वरदाडे, शिंदवणे.
मावळ (गावे 19) : देवले, खांडशी, मळवली, दिवड, सावळा, महागाव, वडेश्वर, बऊर, इंदोरी, देवघर, कशाळ, तिकोना, उर्से, गोडुंबे, कुसवली, टाकवे खुर्द, प्रभाचीवाडी, मळवंडी टुले, कोथुर्णे.
मुळशी (गावे 12) : आंधळे कातरखडक, अंबडवेट, सावरगाव, कुळे, मुठा, लव्हार्डे, गडले, आंदेशे, तैलबैला, वांद्रे, पिंपरी.
भोर (गावे 10) : साळुंगण, शिरवली हिमा, वरोडी खु., डेहेण, हिर्डोशी, पळसोशी, पाले, वरोडी बु. - डाय, बालवडी, करंजगाव.
वेल्हे (गावे 11) : वाजेघर खु., पाल बु., आसणी मंजाई, घिसर, चांदर, खानू, निगडे मोसे, मोसे बु., शिरकोली, कुर्तवडी, केळद.
दौंड (गावे 2) : केडगाव, बिरोबावाडी.