नोटाबंदीनंतर भाजपची पहिली परीक्षा; 4 फेब्रुवारीला मतदान 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

चंडीगड/पणजी : पंजाब व गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थंडावला असून, 4 फेब्रुवारीला मतदानाला सामोरे जाणाऱ्या या राज्यांत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

चंडीगड/पणजी : पंजाब व गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थंडावला असून, 4 फेब्रुवारीला मतदानाला सामोरे जाणाऱ्या या राज्यांत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पंजाबमधील 117 तर गोव्यातील 40 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, दोन्ही राज्यांत सत्तेत असलेला भाजप नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्रथम या निवणुकीच्या निमित्ताने मोठ्या चाचणीस सामोरा जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, वित्तमंत्री अरुण जेटली, पक्षाध्यक्ष अमित शहा यांसह मातब्बर नेत्यांनी गोव्यात प्रचाराची राळ उडविली होती. दुसरीकडे कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या इतिहासात प्रथम प्रचाराच्या मैदानात उतरल्या नसल्याचे स्पष्ट झाले असून, ही जबाबदारी उपाध्यक्ष राहुल गांधी व पक्षातील अन्य नेत्यांवर सोपविण्यात आली होती. आम आदमी पक्ष दोन्ही राज्यांत निवडणूक आखाड्यात उतरला असून, पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप व कॉंग्रेसबरोबर आपणही तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्याचा दावा आपने केला आहे. 

अमली पदार्थ तस्करी, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था, कॅनॉल प्रश्न आदी मुद्दे निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने चर्चेस येऊन आपापसात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आता दोन्ही राज्यांतील जनता कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.