पंजाबमध्ये कॉंग्रेसकडून भाजप-अकाली चितपट!

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या राज्यांसहित पंजाबमधील निवडणुकीतील निकाल हा सर्वांत धक्कादायक असेल, अशी व्यक्त करण्यात आलेली भीती खरी ठरण्याची शक्‍यता आणखी गडद झाली आहे.

पंजाबमध्ये भारतीय जनता पक्ष व अकाली दल या पक्षांच्या युतीस मोठा फटका बसण्याचा अंदाज बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आला होता. पंजाबमधील एकूण 117 जागांपैकी 106 जागांसाठीची मतमोजणी सुरु झाली असून या जागांपैकी तब्बल 59 जागांवर कॉंग्रेसने आघाडी घेतल्याचे आढळून आले आहे.

राज्यात सध्या सत्तेत असलेल्या भाजप-अकाली युतीस 23 जागांवर आघाडी मिळाली आहे; तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षासही (आप) राज्यात उल्लेखनीय यश मिळण्याची शक्‍यता आहे. आपला राज्यामध्ये सध्या 21 जागांवर आघाडी मिळाली आहे; तर "इतर' 3 जागांवर आघाडीवर आहेत.

राज्यात सर्वांत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या लांबी मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी सध्या ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अमरिंदर सिंग यांच्याविरोधात सध्या 1,251 मतांची आघाडी घेतली आहे; तर अकाली दलाचे अन्य ज्येष्ठ नेते सुखबीर सिंग बादल हेदेखील जलालाबाद मतदारसंघामध्ये आघाडीवर आहेत.

याचबरोबर, आता कॉंग्रेसकडून निवडणूक लढवित असलेले नवज्योत सिंग सिद्धु हेदेखील अमृतसर येथील मतदारसंघामधून सहा हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत.

Web Title: Punjab Congress captain amarinder Rahul Gandhi