संघर्ष सुरूच राहणार : केजरीवाल 

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

नवी दिल्ली : पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी जनता पक्षाला अपेक्षित यश मिळविता आले नाही. या पार्श्‍वभूमीवर आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निकाल स्विकारला असल्याचे सांगत संघर्ष सुरूच राहणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

नवी दिल्ली : पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी जनता पक्षाला अपेक्षित यश मिळविता आले नाही. या पार्श्‍वभूमीवर आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निकाल स्विकारला असल्याचे सांगत संघर्ष सुरूच राहणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला 22 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर गोव्यामध्ये अद्याप एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही. गोव्यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रचंड अटीतटीची लढत सुरू आहे. दोन्ही पक्ष 12 जागांवर आघाडीवर आहेत. तर पंजाबमध्ये मतदारांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा कौल दिला असल्याचे चित्र आहे.

या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "जनतेचा निर्णय नम्र भावनेने स्विकारला आहे. सर्व कार्यकर्त्यांची खूप मेहनत घेतली. संघर्ष सुरूच राहणार आहे', अशा शब्दांत केजरीवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आम आदमी पक्षाला गोवा आणि पंजाबमध्ये यश मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र दोन्ही ठिकाणी काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे.

दरम्यान, आज (शनिवार) निकाल जाहीर होण्यापूर्वीच केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर "आप'च्या कार्यकर्त्यांनी विजय गृहित धरत आनंद साजरा करण्याची तयारी केली होती. "जय हो' हे गीत त्यांच्या निवासस्थानाबाहेर वाजत होते. निकाल जाणून घेण्यासाठी केजरीवाल यांनी आज सकाळी "मॉर्निंग वॉक'ला जाणेही टाळले होते. 

दिल्लीतील विजयानंतर "आप'ने पंजाब आणि गोवा येथे आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. "आप'चे खासदार भगवंत मान यांनी तर पंजाबमध्ये "आप'ला 100 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्‍वास व्यक्त केला होता.

Web Title: Punjab election Goa election Arvind Kejriwal AAP